आगामी २०२२ मध्ये होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी शिरोमणी अकाली दल आणि बहुजन समाज पार्टीमध्ये आघाडी झालीय. तब्बल २५ वर्षानंतर हे दोन्ही पक्ष एकत्र आलेत. त्यामुळे पंजाबमधील काँग्रेसच्या सत्तेसमोर तगडं आव्हान उभं राहण्याची शक्यता वर्तवली जातेय. याआधी शिरोमणी अकाली दल हा पक्ष भाजपसोबत मिळून दहा वर्ष सत्तेत होता. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांची सत्ता गेली होती. त्यानंतर कृषी कायद्याला विरोध करत अकाली दल भाजपची साथ सोडत एनडीएतून बाहेर पडला होता.